डाक विभागाच्या राजापुरातील फ्रंचायसीचा शुभारंभ

राजापूर : भारतीय डाक विभागाच्या सुधारित फ्रंचायसी याजनेंतर्गत राजापूर शहरातील बाजारपेठेत आऊटलेट सुरू करण्यात आले असून याचा शुभारंभ गोवा क्षेत्रीय कार्यालयाचे डाक निदेशक आर. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय डाक विभागाने अधिकृतरीत्या आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी एका सुधारित फ्रेंचायसी योजनेची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये देशभरात भारतीय डाक फ्रेंचायसी आउटलेट उघडण्यासाठी व्यक्ति आणि उद्योजक किंवा संस्थाकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. ग्राहकांना डाक विभागाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय टपाल विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून राजापूर शहर बाजारपेठेत कौस्तुभ ठाकुरदेसाई यांना अधिकृत केलेल्या सुधारित फ्रेंचायसीचे उद्घाटन डाक निदेशक आर. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक डी. एस. कुलकणी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह संजय मठकर यांच्यासह राजापूर पोस्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



