मुख्य बातमी
रत्नागिरी तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

रत्नागिरी : तालुक्याला काहीवेळा पूर्वी २.८ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. आज (१२ मार्च) रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप जाणवला.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर आणि रेखांश ७३.४४ पूर्व असा रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी येथे जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता कमी असली तरी काही भागांतील नागरिकांना जमिनीला सौम्य कंप जाणवल्याने ते घराबाहेर आले होते.
प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



