मुख्य बातमी

समर्थ इन्व्हेस्टमेंट्सचे समर्थ रत्न सन्मान पुरस्कार जाहीर

उद्या वितरण : गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांची उपस्थिती

रत्नागिरी : समर्थ इन्व्हेस्टमेंट्सच्या पाचव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत समर्थ रत्न सन्मान पुरस्कार आणि समर्थ रत्न कौतुक पुरस्कार यांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण श्रीराम नवमीच्या पवित्रदिनी म्हणजेच गुरुवारी (२६ मार्च) सायंकाळी ६ वाजता, स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे होणार आहे.

समर्थ रत्न सन्मान पुरस्कार रत्नागिरीतील वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिथयश डॉ. अलिमिया परकार, उद्योजक जयंतराव देसाई आणि डॉ. विवेक भिडे यांना जाहीर झाला आहेत, तर जगातील सर्वात कमी वयातील जलतरणपट्टू म्हणून नावाजलेली वेदा सरफरे आणि धावपटू प्रसाद देवस्थळी यांची निवड समर्थ रत्न कौतुक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षांत गायक, संगीतकार, परीक्षक, लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि पुन्हा तरुण पिढीला मराठी अभिजात कवितेकडे वळवणारा एक प्रतिभावंत कलाकार आणि संवेदनशील माणूस डॉ. सलील कुलकर्णी हे “माझे जगणे होते गाणे” या कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांशी संवाद साधणार आहेत.

विविध क्षेत्रांमध्ये अविरत कार्यमग्न राहून मोलाचे योगदान देणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान व गेल्या वर्षामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करून समाजमनावर आपली हुकूमी छाप पाडणाऱ्या गुणवंतांचा कौतुक सोहळा समर्थ समर्थ इन्व्हेस्टमेंट्सच्या वतीने केला जात आहे. हे या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे.

या कार्यक्रमासाठी प्रवेश केवळ प्रवेशिका धारकांनाच मिळणार असून, आसन क्रमांक लिहिलेल्या विनामूल्य प्रवेशिका २४ मार्चपासून सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत कालावधीत समर्थ इन्व्हेस्टमेंट्सच्या दुकान क्र. ५, सुहास प्लाझा, पारसे स्क्वेअर कॉलनी, साळवी स्टॉप, रत्नागिरी या पत्त्यावरून घेऊन जाव्यात, असे आवाहन प्रिया थेटे, अनिरुध्द थेटे, गौरी जोशी, निलेश जोशी, ऋचा थेटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!