राजापूर ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्राचे ४ एप्रिल रोजी उद्घाटन

राजापूर : ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत रक्त साठवणूक केंद्र (ब्लड स्टोरेज युनिट) सुरू करण्यात येत असून त्याचे उद्घाटन ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
तालुक्यातील रुग्णांना तातडीच्या परिस्थितीत रक्त सहज उपलब्ध व्हावे, यासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत मोठी भर पडणार असून आपत्कालीन वैद्यकीय सेवांना गती मिळणार आहे.
या केंद्राचे उद्घाटन स्थानिक आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला खासदार नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी डॉ. जैस्मिन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे तसेच पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.


