भाजपच्या रत्नागिरी दक्षिण मंडल प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडून घोषणा

रत्नागिरी : भाजप द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी मंडल प्रभारींचीही घोषणा केली आहे. मंडल अध्यक्ष व कार्यकारिणी काम करत असते. आता पक्ष संघटनेत नव्याने प्रभारींचीही नेमणूक करण्याची सूचना आली. त्यानुसार श्री. यादव यांनी मंडल प्रभारींची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
मंडल प्रभारींची नावे अशी- रामदास राणे (चिपळूण ग्रामीण), विजय चितळे (चिपळूण शहर), प्रमोद अधटराव (संगमेश्वर उत्तर), नीलेश भुरवणे (संगमेश्वर दक्षिण), राजू भाटलेकर (रत्नागिरी मध्य), अशोक वाडेकर (रत्नागिरी दक्षिण), चंद्रशेखऱ निमकर (रत्नागिरी उत्तर), ओंकार फडके (रत्नागिरी शहर), चंद्रकांत मांडवकर (लांजा दक्षिण), विजय कुरूप (लांजा उत्तर), अभिजित गुरव (राजापूर पूर्व) आणि अनिल करंगुटकर (राजापूर पश्चिम).
भाजपची जिल्हा कार्यकारिणी आणि आता नव्याने जाहीर केलेले मंडल प्रभारी भाजप पक्ष संघटन मजबूत करतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष यादव यांनी व्यक्त केला.


