मुख्य बातमी

सीबीएससीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी १५ मे ते २१ मेपर्यंत सकाळी ९ पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (दिल्ली, सीबीएससी) अध्यक्ष यांच्यामार्फत घेण्यात येणारी इयत्ता १० वी ची परीक्षा जिल्ह्यातील पोदार इंटरनॅशनल स्कुल, रत्नागिरी या केंद्रावर दि. १५ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत परीक्षा सकाळी १० ते दुपारी १.३० वाजता या कालावधीत घेणार असून, परीक्षा केंद्राचे १०० मीटरच्या परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ प्रमाणे

प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्हयातील पोदार इंटरनॅशनल स्कुल, रत्नागिरी या परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परीसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच सदरील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी दिनांक १५ मे ते २१ मे रोजी पर्यंत सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. २००-३०० मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण, सायबर कॅफे, फोटोकॉपी इ. माध्यमे आदेशांची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगरानी करणारे अधिकारी / पोलीस अधिकारी यांचे बाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडणाच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील.

या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!