मुख्य बातमी

पाईपलाईन फुटल्याने पाली बाजारपेठचा पाणीपुरवठा पंधरा दिवस बंद

रत्नागिरी : पाली ग्रामपंचायतीच्या पाली बाजारपेठ व देवतळे या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची मुख्य पाईपलाईन फुटलेली असल्याने या भागात फक्त गेल्या पंधरा दिवसातून एकदाच पाणी पुरवठा झाला आहे तो ही आता पुन्हा बंद झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे.

या योजनेच्या ठेकेदाराने पाईपलाईनचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ती वारंवार फुटत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे लाखो रुपयांची योजना व पुरेसा पाणीसाठा असूनही केवळ ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे पाली बाजारपेठ व देवतळे या भागात गेल्या पंधरा दिवसात केवळ  एकदा पाणी आले आहे. त्यानंतर आता पुन्हा पाणी पुरवठा बंद झाला आहे. या बेजबाबदार कंत्राटदारावर ग्रामपंचायतीच्याकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!