मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
वालोपेतील अपघातग्रस्त आग्रे कुटुंबीयांचे आमदार प्रमोद जठार यांच्याकडून सांत्वन; ५० हजारांची आर्थिक मदत

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे (ता. चिपळूण) येथे रविवारी रात्री आग्रे कुटुंबीयांच्या दुचाकीला मागून धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या बालिकेसह तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार प्रमोद जठार यांनी पीडित आग्रे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत ५० हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली.
या प्रसंगी भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, रत्नदीप देवळेकर, बूथ प्रमुख तसेच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. या भीषण अपघातामुळे संपूर्ण चिपळूण तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



