मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात

रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य क्रांतिकारक, विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक होते. सशस्त्र क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला नवीन दिशा दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या सुखाचा, कुटुंबाचा आणि आयुष्याचा त्याग केला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील अधिकारी/कर्मचारी वर्ग यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.



