मुख्य बातमी
डोर्ले येथील विश्रांती पोकडे यांचे निधन

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथील विश्रांती वासुदेव पोकडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुलगे एक मुलगी असून डोर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत पोकडे यांच्या त्या मातोश्री होय. त्यांच्या निधनाने डोर्ले पंचक्रोशीत दुःखाची शोककळा पसरली आहे. त्यांची दशक्रिया विधी ४ जून रोजी डोर्ले येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.



