पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रत्नागिरीत भाजपतर्फे अभिवादन

रत्नागिरी : मालवा प्रांताच्या कर्तृत्ववान शासक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज रत्नागिरी जिल्हा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या सूचनेनुसार दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली व वर्षा ढेकणे, राजू भाटलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाधिकारी वर्षा ढेकणे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. “महिला सक्षमीकरणाचे खरे प्रतीक म्हणजे अहिल्यादेवी. त्यांनी दाखवलेला आदर्श आजच्या पिढीने घ्यावा,” असे मनोज पाटणकर म्हणाले. सरचिटणीस निलेश आखाडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या संपूर्ण जीवनात बद्दल माहिती दिली.
अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावी झाला. सन १७६७ ते १७९५ या २८ वर्षांच्या काळात त्यांनी इंदूर संस्थानचा कारभार अत्यंत कुशलतेने सांभाळला. त्यांच्या काळात न्याय, शेती, व्यापार आणि धर्मकार्य याला विशेष महत्त्व दिले गेले. काशी, गया, सोमनाथ, द्वारका, रामेश्वर, पंढरपूर, जेजुरीसह देशभरातील शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार व घाट बांधणीचे काम त्यांनी केले. रस्ते, विहिरी, धर्मशाळा उभारून त्या लोककल्याणकारी राज्यकर्त्या ठरल्या. ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून त्यांचा लौकिक आहे.
या कार्यक्रमास संतोष सावंत, निलेश आखाडे, राजू भाटलेकर, शैलेंद्र बेर्डे, संदीप सुर्वे, प्रशांत घाणेकर, विजया भाटकर, सारिका शर्मा, राजेंद्र फाळके, भक्ती दळी, विक्रम जैन यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार नगरसेवक, शहर सरचिटणीस संदीप सुर्वे यांनी मानले.



