सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आबलोली पंचक्रोशीतील इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा आणि स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा तसेच एमएससीआयटीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थांचा शुभेच्छा कार्यक्रम सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतचे सरपंच ॲड. प्रतीक पवार होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून शारदा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी यांनी सर्वांचे स्वागत केले.
त्यानंतर एमएससीआयटी उत्तीर्ण विद्यार्थांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर मार्च २०२६ मधील परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते हॉल तिकीट आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी मधील विद्यार्थांना व स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
यावेळी निर्मल ग्रामपंचायत खोडदेचे सरपंच ॲड. प्रतीक पवार यांच्यासह ग्रामविकास अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उद्योजक गजानन साळवी, सेवानिवृत्त गव्हर्मेंट ऑडीटर जगदीश साळवी, पत्रकार संदेश कदम यांनी विद्यार्थांना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश साळवी यांनी केले. सूत्रसंचालन आर्या प्रशांत साळवी हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुयश कॉम्प्युटरच्या संचालिका सौ. सावी साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, प्रवीण आचरेकर, सिद्धी डिंगणकर, सलोनी मोहिते, विशाखा झगडे यांनी विशेष प्रयत्न केले. संचालक संदेश साळवी यांनी सर्वांचे आभार मानले.



