मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पाटपन्हाळे येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत कदम यांचे निधन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील बौध्दजन सहकारी संघ पाटपन्हाळे शाखा क्र. ११ चे माजी सल्लागार दिवंगत गणपत भिकू कदम (वय ७५) निधन झाले.

सन १९८८ च्या दरम्यान मिलकामगार होते. गणपत कदम यांचा गावाच्या सामाजिक शैक्षणिक प्रगतीमध्ये मोलाचा वाटा होता. अत्यंत मनमिळावू आणि कार्यतत्पर म्हणून त्यांनी आपली समाजात ओळख निर्माण केली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांचा जलदान विधी व शोकसभा २१ जून रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरी (मु. पो. पाटपन्हाळे, कदमवाडी, ता. गुहागर) येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!