मुख्य बातमी

रत्नागिरी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे

ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सावंत यांच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृह वापरण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या ५ रुपयांच्या शुल्काबाबत युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी केलेल्या तक्रारीची दखल कोकण रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. रत्नागिरी स्थानकावरील प्रसाधनगृह वापरण्यासाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करून ती सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव उचित निर्णयासाठी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील निगम कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मंडल वाणिज्य प्रबंधक शैलेश डी. आंबर्डेकर यांनी प्रसाद सावंत यांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, रत्नागिरी स्थानकावरील प्रसाधनगृहाचा ठेका १ एप्रिल २०२६ पासून “चालवा व देखभाल” या तत्वावर देण्यात आला आहे. नव्या ठेक्यानुसार लघवीसाठी युरिनल्स वापरावर ५ रुपये शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली होती. हे शुल्क झोनल रेल्वेच्या धोरणानुसार आकारले जात असून ठेकेदार अटी-शर्तीनुसारच वागत असल्याने त्याच्यावर कारवाई करता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मात्र, प्रसाद सावंत यांनी केलेल्या मागणीची दखल घेत, रत्नागिरी स्थानकावरील प्रसाधनगृहात लघवीसाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करून ती सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव उचित निर्णयासाठी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील निगम कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याचे पत्रात म्हटले आहे.

युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सावंत यांनी २९ मे रोजी रोजी पत्र देऊन रत्नागिरी स्थानकावर बेकायदेशीर शुल्क आकारणी होत असल्याची तक्रार केली होती. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने हे शुल्क तातडीने बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला यश मिळाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. आता बेलापूर येथील मुख्य कार्यालयाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

“मला कोंकण रेल्वे प्रशासनाकडून आज (२२ जून) पत्र प्राप्त झाले असून उचित कार्यवाहीसाठी आमच्या मागण्यांचा प्रस्ताव बेलापुर येथील निगम कार्यालयात पाठवल्याचे म्हटले आहे. परंतु माझ्या समजुतीसाठी मला पत्र पाठवलं असेल तर मी कोंकण रेल्वे प्रशासनाला सांगू ईच्छीतो की १५ दिवसांच्या आत यावर निर्णय दिला नाहीतर त्या प्रसाधन गृहामध्ये ठेकेदाराचा माणूस दिसणार नाही, असा इशारा प्रसाद सावंत यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!