सन २०२३ आणि २०२४ चे कृषी पुरस्कार जाहीर; जिल्ह्यातील सहाजणांचा समावेश

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने सन २०२३ आणि २०२४ वर्षासाठी प्रदान करण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. सन २०२३ करिता २ पुरस्कार व सन २०२४ करिता ४ असे एकूण जिल्ह्यातील सहाजणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कारप्राप्त शेतकरी पती व पत्नी दोघांचा १ जुलै रोजी कृषी दिनाच्या दिवशी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
सन २०२३ साठी जाहीर झालेले पुरस्कार : वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार – (पुरस्काराचे स्वरूप धनादेश रु. १ लाख २० हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई (मु. पो. ओणी, ता. राजापूर).
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)- (पुरस्काराचे स्वरूप धनादेश रु. ४४ हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) अनंत बाबाजी खांबे (मु. पो. मांडकी, ता.चिपळूण).
सन २०२४ साठी जाहीर झालेले पुरस्कार : वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार – (पुरस्काराचे स्वरूप धनादेश रु. २ लाख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात आनंद जयंत देसाई (मु. पो. पावस ता. रत्नागिरी).
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- (पुरस्काराचे स्वरूप धनादेश रु. १ लाख २० हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात मैरुन हमीद नाकाडे (मु. पो. नेवरे ता. रत्नागिरी).
उद्यान पंडित पुरस्कार- (पुरस्काराचे स्वरूप धनादेश रु. १ लाख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात धनंजय श्रीकृष्ण केतकर (मु. पो. भिले, ता. चिपळूण).
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)- (पुरस्काराचे स्वरूप धनादेश रु. ४४ हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) दयानंद बाबाजी चौगुले (मु.पो. खरवते – गावठाणवाडी, ता. राजापूर)
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कार्थींची निवड करण्यात आली आहे. कक्षाधिकारी रुचिता पिंपळे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले आहेत.



