खरशेतचे सुपुत्र संघराज कदम यांचे एलएलबी परीक्षेत यश

आबलोली (संदेश कदम) : खेरशेत (ता. चिपळूण) गावचे सुपुत्र संघराज संजय कदम यांनी ज्ञानदीप विधी महाविद्यालय बोरज-मोरवंडे (ता. खेड) येथून एलएलबी ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादित केले आहे.
संघराज हे खरशेत गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि खरशेत मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचचे मुख्य प्रवर्तक संजय कदम आणि प्राथमिक शिक्षिका राजमुद्रा कदम यांचे चिरंजीव होत. संघराज कदम यांनी २००९ ते २०१७ मध्ये छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे (ता.खेड) येथे पाचवी ते बारावीपर्यंत सैनिकी शिक्षण पूर्ण केले आहे. देशप्रेम, शिस्त, मेहनत, चिकाटी, सातत्य व अथक परिश्रमामुळे संघराज कदम यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल संघराज कदम यांचे चिपळूण तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.



