मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांची तपासणी शिबिर

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) अंतर्गत गरोदर मातांसाठी विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गरोदर महिलांची सर्वंकष आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला, औषधोपचार तसेच पोषण, नियमित तपासणी, लसीकरण आणि सुरक्षित प्रसूतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरादरम्यान रक्तदाब, हिमोग्लोबिन, वजन, रक्त व लघवी तपासणीसह गर्भाच्या वाढीचे परीक्षण करण्यात आले. उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची स्वतंत्र नोंद घेऊन त्यांना पुढील उपचार व आवश्यक संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमासाठी वैद्यकीय अधिकारीसुनीता पवार, आरोग्य सहाय्ययिका श्रीमती पाडवी, आरोग्य सेविका श्रीमती गावणकर श्रीमती गावडे , समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती तारवे (CHO), आशा स्वयंसेविका यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण भागातील गरोदर महिलांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळावी तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने अशा शिबिरांचे नियमित आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



