मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ठाकरे शिवसेनेच्या शृंगारतळी जि. प. गट विभाग प्रमुखपदी अतुल लांजेकर यांची नियुक्ती

आबलोली (संदेश कदम) : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि झोंबडी (ता. गुहागर) गावचे सरपंच अतुल लांजेकर यांची शृंगारतळी जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. आमदार जाधव यांनी पक्ष कार्यालयात ही नियुक्ती जाहीर केली.

अतिशय नम्र आणि लोकांची कामे करणारे कार्यकर्ते म्हणून श्री. लांजेकर यांची ख्याती आहे. त्यांचा जनसपंर्क दांडका असून संघटना वाढीसाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन ते विकास कामे करतात. श्री. लांजेकर यांच्या नियुक्तीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात आणि शृंगारतळी जिल्हा परिषद गटात जल्लोष साजरा करण्यात येत असून नियुक्तीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

आमदार जाधव यांनी श्री. लांजेकर यांना नियुक्ती पत्र देऊन हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणे आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे काम आपल्या हातून घडो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, तालुका प्रमुख सचिन बाईत, जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळ्ये यांच्यासह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!