रत्नागिरीत स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथीनिमित्त प्रवचन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांच्या वतीने येत्या शनिवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी ५.४५ ते ७.४५ या वेळेत अध्यात्म मंदिर वरची आळी, रत्नागिरी येथे सौ. नीलिमा लिमये (पुणे) यांचे ‘अंतरी असावा अखंड उल्हास’ प्रवचन व श्री क्षेत्र पावस षण्मासिकाचे प्रकाशन असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सौ. नीलिमा लिमये या बी.कॉम असून फायनान्स या विषयात एमबीए केले आहे. गेली २५ वर्षे आयटी क्षेत्रात फायनान्स डिपार्टमेंटमध्ये त्या नोकरी करीत आहेत. तसेच त्यांना प. पू. डॉ श्रीकृष्ण देशमुख, मुरगूड यांचा अनुग्रह मिळाला आहे आणि तेव्हापासून दासबोध, भगवद्गीता या ग्रंथाचा अभ्यास सुरू आहे. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त व सह सचिव आहेत. तसेच शिवथरघळ येथे युवा तसेच प्रापंचिक शिबिरात सत्र घेतात.
या प्रवचन व श्री क्षेत्र पावस षण्मासिकाच्या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी केले आहे.



