मुख्य बातमी

नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जलसंधारण दिन साजरा

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या येथील नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स येथे माजी मुख्यमंत्री जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. राजेश कांबळे यांनी केले. यामध्ये त्यांनी या कार्यक्रमचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. या दिनानिमित्त अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी कुमारी दिव्या वाडकर हिने पाणी या विषयावर उत्तम असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी व्यक्त केले. यामध्ये त्यांनी जलसंधारण दिन का साजरा केला जातो, पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश कोणी व का दिला आपल्या, धरती वरील सजीवांसाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी असलेले पाण्याचे आणि मातीचे महत्त्व आणि पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन कसे केले पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. निकिता नलावडे, प्रा. श्रेया राऊत, प्रा. हुमेरा वणू यांसह अन्य प्राध्यापक आणि कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!