क्रीडामुख्य बातमी

लाठीकाठीतील यशाबद्दल अर्थव आणि सारा कांबळे यांचा सन्मान 

रत्नागिरी : तालुक्यातील वेतोशी गावचे सुपुत्र असलेल्या अथर्व सुधीर कांबळे व सारा सुधीर कांबळे यांनी लाठीकाठी क्षेत्रात जिल्हास्तरीय ते एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांकावर विजय मिळविला आहे. नुकताच त्यांनी दापोलीतील आझाद मैदान बॅडमिंटन हाॅल येथे न थांबता सलग एक तास एक मिनिट एक सेकंद एवढा काठी फिरविण्याचा जागतिक विश्वविक्रम केला. यानिमित्त त्यांची राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी आकाशवाणी एफ एम गोल्ड वाहिनीवर मुलाखत घेण्यात आली.

अथर्व आणि सारा कांबळे हे दोघेही शिव शंभो मर्दानी आखाडा महाराष्ट्र राज्य संचलित दिवंगत महादेव व्यायाम शाळा या संस्थेचे खेळाडू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!