महाराष्ट्रमुख्य बातमी

राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता

पुढील दोन दिवसही पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. बारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्याला बुधवारी आणि गुरुवारी देखील अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी बारा जिल्ह्यांना ऑरेंज, तर अवघ्या राज्याला येलो अलर्ट देण्यात आला. तसेच गुरुवारी देखील यलो अलर्ट देण्यात आला असून शुक्रवारपासून पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूरचा या भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर काही ठिकाणी दुपारपासून विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळला. याच पार्श्वभूमीवर पुढील २ दिवसही महाराष्ट्रात विविध भागांत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. घाट माथ्यासह शहरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसासाठी अलर्ट रहावे आणि सज्ज रहावे अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!