मुख्य बातमी
मेर्वी येथे मूर्तीकार वामन सुवरे यांचा सत्कार

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील अंजनी निवासस्थानी रत्नागिरीचे प्रसिद्ध मूर्तिकार वामन विठ्ठल सुवरे यांनी सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष अनंत पेटकर यांच्या हस्ते श्री. सुवरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रूपेश पालेकर, शिक्षक चंद्रशेखर पेटकर, सौ. मैथिली चंद्रशेखर पेटकर, शुभम चंद्रशेखर पेटकर, पत्रकार दिनेश पेटकर, पिंट्या पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.


