माजी आमदार बाळ माने यांनी घेतलले पिलणकर कुटुंबीयांच्या बाप्पाचे दर्शन

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या या पवित्र आणि मांगल्याच्या वातावरणात कोकणात ठिकठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी कोमल पिलणकर आणि दुर्गेश पिलणकर यांच्या निवासस्थानी जाऊन लाडक्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
या सदिच्छा भेटीदरम्यान पिलणकर कुटुंबात अत्यंत आनंदाचे व आल्हाददायक वातावरण पाहायला मिळाले. बाप्पाच्या दर्शनावेळी राजेश पिलणकर, एकनाथ पिलणकर, हर्षदा पिलणकर, रिया पिलणकर, स्वाती पिलणकर, चंदना पिलणकर यांच्यासह संपूर्ण पिलणकर परिवार उपस्थित होता.
या मंगल प्रसंगी बाप्पाच्या सानिध्यात सर्वांनी परस्परांसोबत आपुलकीने संवाद साधला. बाप्पाच्या कृपेने सर्वांच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदावे, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. गणरायाच्या भक्तीत आणि आप्तांच्या सहवासात रंगलेला हा आनंदाचा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत स्मरणीय ठरला.



