मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दाभोळ पॉवर प्रोजेक्टसाठी दिलेल्या एकूण जमिनी पैकी वापरात नसलेली २०० हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत करा..!

अंजनवेल मधील सुमारे तीनशे शेतकऱ्यांची सरकारकडे आग्रही मागणी

आबलोली (संदेश कदम) : सन १९९४ मध्ये जमीन अधिग्रहण करताना शासनाने शेतकऱ्यांना केवळ ८५ टक्के मोबदला दिला. उर्वरित १५ टक्के फरकाची रक्कम व्याजासहित शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा अंजनवेलमधील प्रकल्पग्रस्त शेतकरी शासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार आहेत, असा गंभीर इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि अंजनवेल (बोर भाटले – कातळवाडी) ग्रामस्थ मंडळाचे सरचिटणीस यशवंत सोनू बाईत यांनी दिला. गुहागर तालुक्यातील कातलवाडी – बोरभाटले येथील सहाण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आरोप असून ६१० हेक्टर पैकी उर्वरित २०० हेक्टर जमीन पडून असल्याने शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी केली. आमची मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचा गंभीर इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते यशवंत बाईत यांनी दिला आहे.

यावेळी विठ्ठल (बावा) भालेकर, चंद्रशेखर बाईत, सुरेश देवाळे, गंगाराम भुवड आणि अंजनवेल – कातळवाडी, वेलदूर – घरटवाडी व रानवी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!