मुख्य बातमी

रत्नागिरीत गांजा विक्री करणारा तरुण ताब्यात 

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने शहर परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना नाचणकर चाळ येथे गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० हजार रुपये किंमत असलेला सुमारे १ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी NDPS रेकॉर्डवरील आरोपी सूरज परशुराम नंदिवले (वय २४, सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी रत्नागिरी, मूळ रा. पाचवड ता. वाई जि. सातारा) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई २८ ऑक्टोबर रोजी प्रभारी पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाद्वारे शहर परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना नाचणकर चाळ, रत्नागिरी येथे NDPS रेकॉर्डवरील आरोपी सूरज परशुराम नंदिवले याने १ किलो २०१ ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बाळगल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सूरज याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून ६० हजार ५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सूरज याच्यावर NDPS Act प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलिस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!