महाराष्ट्रमुख्य बातमी

ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यावर त्यांनी मात केली होती. मात्र त्यानंतर त्यांना हृदयासंबंधीचा विकार झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे.

‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. उजवणे यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिरारोड येथील एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज (शनिवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!