मुख्य बातमी

सुकांत ऊर्फ भाई सावंत याचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी : पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणातील आरोपी असलेला पती सुकांत ऊर्फ भाई सावंत याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. खून प्रकरणात मागील दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या भाई सावंत याच्याकडून जामिनासाठी न्यायालयापुढे अर्ज दाखल करण्यात आला होता.

रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयापुढे या जामीन अर्जावर सुनावणी झाली. स्वप्नाली सावंत यांचा १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून केल्याचा आरोप पती सुकांत ऊर्फ भाई सावंत, रूपेश ऊर्फ रूप्या कमलाकर सावंत व प्रमोद ऊर्फ पम्या बाळू गावणंग (रा. सर्व मिर्या बंदर, रत्नागिरी) यांच्यावर ठेवला आहे. सरकार पक्षाकडून ॲड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!