मुख्य बातमीराजकारण

रत्नागिरी तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या जाहीर

रत्नागिरी : तालुक्यात व शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) गेल्या काही महिन्यांत कमालीचा वेग पकडला आहे. आगामी निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेत अनेक आंदोलन, प्रश्न उपस्थित करत नागरिकांना आपल्या कामाने प्रभावित केले आहे. महिला आघाडी मजबूत करतानाच शहरात महिला पदाधिकारी तसेच तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद गटातील नवनियुक्ती केल्या आहेत.

उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने नाचणे जिल्हा परिषद गटात दत्तात्रय काशिनाथ गुरव यांची विभाग अध्यक्ष (नाचणे), रोहित शशिकांत मुलुख yanchi शाखा अध्यक्ष (नाचणे), अनंत बाबू येडगे यांची उपशाखा अध्यक्ष (नाचणे), संकेत मंगेश खत्री यांची शाखा अध्यक्ष (खेडशी), प्रणव अनिल घाटकर यांची गटअध्यक्ष (कारवंचीवाडी), आशिष कट्टीमणी यांची उपविभाग अध्यक्ष (कारवंचीवाडी), राहुल अनिल नलावडे यांची गट अध्यक्ष (कातळवाडी) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, शेतकरी सेना उपजिल्हाध्यक्ष भाई साळवी, महिला शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!