मुख्य बातमी

कळंझोडी फाटा २ ते वाटद पूर्व बौद्धवाडी रस्त्याचे लाखो चे काम ठेकेदाराकडून फुकट?

रत्नागिरी : तालुक्यातील कळंझोडी फाटा २ ते वाटद पूर्व बौद्धवाडीला जाणाऱ्या रस्त्याचे अंदाजे १४,६९,८७५ रुपये खर्चाचे काम उत्तर सा. बां विभाग रत्नागिरी ने रस्त्याचे “टेंडर एका ठेकेदाराला देण्यात आले होते; मात्र, RTI (माहितीचा अधिकार) अंतर्गत मिळालेल्या माहितीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. कामाची देयक विभागीय कार्यालयात प्राप्त झाली आहेत पण आजून पारित करण्यात आलेली नाहीत आजपर्यंत ठेकेदाराला या कामासाठी एकही रुपया सा. बां. विभागा कडून देण्यात आलेला नाही असे समजते.

या रस्त्याचे काम २६ मे २०२४ रोजी काम करत असताना समजल्यावर RTI कार्यकर्ते व पत्रकार निलेश रहाटे, संकेत ढवळे, यशवंत किंजले व गावातील काही नागरिकांनी रस्त्याची पाहणी केली. त्या वेळी गावचे सरपंच अमित वाडकर ही सोबत होते व काम कशाप्रकारे करण्यात येत आहे, हे त्याच्या निर्दशनास आणून दिले होते. प्रत्यक्ष पाहणीत रस्ता किती निष्कृष्ट दर्जाचा बनवला आहे हे दिसत होते. मिळालेल्या माहिती नुसार, टेंडर देण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव वेगळे आहे व प्रत्यक्षत तिथे काम करणारा ठेकेदार हा दुसरा आहे हे काम टेंडर घेणाऱ्या नी केलेले नसून, प्रत्यक्षात दुसऱ्या ठेकेदार नी काम केले आहे असे दिसते. वरून आलेली काम ही चालू असताना ग्रामपंचायतमधील कोणाला ही माहिती नसतात हे मोठे नवल आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, RTI द्वारे माहिती मागविल्यानंतरच रस्त्याजवळ संबंधित टेंडर आणि ठेकेदाराची माहिती दर्शवणारा फलक उभारण्यात आला, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. लाखो रुपयांचे काम करून आज वर्ष होत आले तरी आजवर ठेकेदाराला देयक दिलेले नसेल, तर ते फुकट का आणि कशासाठी करण्यात आले, असा सवाल उपस्थित होत असून, या प्रकरणात काम झाले, पण पैसे दिले नाहीत की पैसेही गेले आणि कामही नीट झाले नाही, याबाबत सखोल चौकशीची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे प्रकरण लवकरच एक वर्ष पूर्ण करणार असून, अद्याप संबंधित यंत्रणांकडून स्पष्टता मिळत नाही किंवा माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का, कामात जर दोष असेल तर आजून पर्यंत संबंधित विभाग गप्प का, नागरिकांनी व RTI कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे यांनी हा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करत त्या रस्त्याची पाहणी करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!