मुख्य बातमीशैक्षणिक

महर्षी कर्वे संस्थेत रुग्णसहाय्यक अभ्यासक्रम सुरू

रत्नागिरी : समाजात रुग्णसेवा सहाय्यकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. महर्षी कर्वे संस्थेत एएनएम नर्सिंग अभ्यासक्रम आहे, आता रुग्णसहाय्यक अभ्यासक्रमामुळे विद्यार्थिनींना रोजगार मिळेल. तसेच शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत, त्यांना ही चांगली संधी आहे, असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष बेडेकर यांनी केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पामध्ये रुग्णसहाय्यक अभ्यासक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) मान्यताप्राप्त रुग्ण सहाय्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू झाला.

मंचावर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे (पुणे) कार्याध्यक्ष रविंद्र देव, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, कॉलेज ऑफ नर्सिंगचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य धनंजय कुलकर्णी, प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई आणि एस. टी. भटेवरा फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती रोझी भटेवरा, मनिष भटेवरा आदी उपस्थित होते.

समाजात नर्सेसची गरज असल्याने नर्सिंग अभ्यासक्रम व आता नवीन इमारत बांधत आहोत. भविष्यात येथे नर्सिंगमधील सर्व अभ्यासक्रम सुरू होतील, असा विश्वास प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी व्यक्त केला. रुग्णसहाय्यक अभ्यासक्रम एक वर्ष मुदतीचा असून दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, नियमित पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकचे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी, महिला याला प्रवेश घेऊ शकतात. तसेच रुग्णालयात आधीपासून काम करणारे, सातवी उत्तीर्ण व रुग्णालयात काम करण्याचा २ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम आहे. कार्याध्यक्ष रविंद्र देव यांनी अध्यक्षीय भाषण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!