तात्पुरत्या कालावधीसाठी अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप बंद : सहायक कामगार आयुक्त

रत्नागिरी : अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिवित नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच २४ एप्रिल रोजीपासून रत्नागिरी, चिपळूण व राजापूर तालुक्यामध्ये वाटप सुरू करण्यात आले होते.
अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप होत असताना प्रचंड स्वरुपात गर्दी व गोंधळ होत आहे तसेच अतिशय कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने कामगारांना या गर्दी गोंधळाचा त्रास होवू नये याबाबत योग्य ती खबरदारी व नियोजन करण्यात येवून तालुका निहाय अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप करण्याबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. त्यामुळे तात्पुरत्या कालावधीसाठी अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप बंद राहील याची नोंद घ्यावी.



