मुख्य बातमी

शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची अखिल भारतीय कृषी अनुसंधान आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी निवड

२ मे ते ५ मे कालावधीत अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय खरवते-दहिवली येथील विद्यार्थ्यांची अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे संलग्न आचार्य नरेंद्र देवा कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, अयोध्या (उत्तर प्रदेश) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा २ मे ते ५ मे दरम्यान घेण्यात येणाऱ्या या भव्य क्रीडा स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी अमिश माने, शिवराज पाटील, सोहम मोरे यांची कबड्डी (मुले) या क्रीडा प्रकारात, चेतन पावरा, सुबोध पोळ, प्रफुल्ल वायकर, तेजस भेलके यांची खो-खो (मुले) क्रीडा प्रकारात निवड करण्यात आली आहे. तसेच व्हॉलीबॉल (मुले) क्रीडा प्रकारात सचिन पाटील व प्रशांत साळुंके यांची निवड झाली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन करत होणाऱ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. निवड झालेले हे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार असून विद्यापीठ संघातील ३० खेळाडूंपैकी ९ खेळाडू हे शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाचे आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, क्रीडा निर्देशक प्रा. सुहास आडनाईक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!