फरीद तांडेलचा सत्कार सोहळा उत्साहात

रत्नागिरी : शहरानजीक असलेल्या रनपार समुद्रात फिरण्यासाठी आलेल्या १६ तरुणांना वाचविणारा फरीद तांडेल याचा सत्कार संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी व सुहेल मुकादम मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी, सुहेल मुकादम मित्र परिवार, आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना, जलतरण संघ, टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशन या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सभासद तसेच शहरातील वकील, डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना फरीद तांडेल म्हणाले की, ज्या वेळी समुद्रात बोट बुडत होती. त्यावेळी मी तेथे होतो. मी क्षणाचाही विचार न करता माझी बोट घेवून त्या बुडणाऱ्या १६ तरुणांना वाचविले. त्यांनंतर कोस्टल गार्ड व पोलिस आले आणि या सर्वांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.”

सध्याच्या समाजातील दुषित होत असलेल्या वातावरणाला फरीदने चोख उत्तर दिले असून समाजाने फरीदचा आदर्श घ्यावा, असे मनोगत यावेळी उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.


