मुख्य बातमीशैक्षणिक

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली

आज ‘या’ ठिकाणी पाहता येणार बारावीचा निकाल

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अशातच आज बारावीचा निकाल लागणार आहे. बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकणार आहेत.

आज (५ मे) रोजी दुपारी १ वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in

sscresult.mkcl.org

hsc.mahresults.org.in

विद्यार्थ्यांनी असा तपासा करावा निकाल

सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.

होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.

क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका.

त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.

यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.

हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांच्यासाठी मंडळाने एक महत्त्वाची अट घातली आहे. “फेब्रुवारी-मार्च २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.” याचा अर्थ, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स घेणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!