मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मुंबई येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव

आबलोली : मुंबई येथील नालंदा बुद्धविहार, सहार गाव येथे बावीस खेडी बौद्धजन संघ, मुंबई विभाग यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिवादन सभा घेण्यात आली. संस्थेच्या माजी वरिष्ठ पदाधिकारी यांचा सत्कार आणि संस्थेतील सदस्य गावातील कार्यकर्ते यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदानंद जाधव होते. दीपक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी सभापती सुरेश जाधव, उपसभापती विजय जाधव, उपाध्यक्ष दीपक कांबळे, चिटणीस दिलीप सावंत, कोषाध्यक्ष विजय पवार यांसह संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्कार अकादमी व तक्षशिला अकादमीचे संचालक प्रफुल्लकुमार सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!