मुख्य बातमी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर; लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य

रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी (२४ जुलै) प्राप्त झाली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित अग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी केले आहे.
कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, संस्थेचे सचिव या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बँकेच्या संबंधित शाखा स्तरावर ​कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी हा आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा आयडी नाही किंवा ज्यांची नोंदणी झालेली नाही, त्यांनी जवळच्या ‘आपले सरकार’ किंवा ‘सीएससी’ (CSC) केंद्रावर जाऊन तात्काळ अग्रीस्टॅक नोंदणी करणे बंधनकारक आहे. यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार किंवा CSC केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे.

आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया आणि त्यासंबंधीची सविस्तर माहिती जिल्ह्यातील सर्व आपले सरकार/CSC केंद्रे तसेच बँकेच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी कोणतीही रक्कम देऊ नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!