मुख्य बातमी
रविवारी सकाळी ८ वाजता तिरंगा रॅली
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी : राष्ट्रहित आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या (११ मे) सकाळी ८ वाजता जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही रॅली मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर काढण्यात येणार आहे.
या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी विविध सामाजिक संस्थानी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


