दापोली तालुक्याला मिळणार बळीराज सेनेचा नवा तालुकाअध्यक्ष
जिल्हाअध्यक्ष पराग कांबळे जाहीर करणार लवकरच नवा तालुका अध्यक्ष

आबलोली (संदेश कदम) : दापोली तालुक्यातील बळीराज सेनेचा नूतन तालुका अध्यक्ष निवडण्यासाठी दापोली तालुक्यात हालचालींना वेग आला असून बळीराज सेनेचे जिल्हाअध्यक्ष पराग कांबळे यांनीसुद्धा सक्षम तालुकाअध्यक्ष पदासाठी चाचपणी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुक कार्यकर्ते यांची लॉबिंग सुरू झाली आहे.
दापोली तालुक्यातील बळीराज सेनेचे कार्यकर्ते यांचे नव्या निवडीकडे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी लवकर दापोलीमध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका संपर्क प्रमुख मनोहर पवार यांनी दिली आहे. दापोली तालुक्यातील बळीराज सेनेच्या अध्यक्षपदासाठी नवीन दमदार चेहरा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तालुका अध्यक्ष व कार्यकारणी निवडण्यात येईल, अशी माहिती मनोहर पवार यांनी दिली.



