मुख्य बातमी
जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे यांनी पदभार स्वीकारला

रत्नागिरी : जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे यांनी आज आपला पदभार स्वीकारला. रत्नागिरी पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनीही श्री. बगाटे यांचे स्वागत केले.




