मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जानवळे येथील श्री साई मंदिराचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जानवळे (जानवळकरवाडी) येथील श्री साई मंदिराचा २७ वा वर्धापन दिन नुकताच विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त सकाळी श्री साई मूर्तीची विधीवत अभिषेक करण्यात आले. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात होमहवन करण्यात त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद आरती, गुहागर तालुक्यातील जानवळे सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप कमलाकर वणगे महाराज यांचे हरिपाठ व कीर्तन कार्यक्रम पार पडला. दुपारी साई भंडारा (महाप्रसाद) याचा लाभ तालुक्यातील साई भक्तांनी घेतला. रात्री महाआरती झाल्यानंतर श्री दत्तगुरु दर्शन मंडळ जानवळे मधलीवाडी यांचे भजन झाले.

या कार्यक्रमासाठी शृंगारतळी ज्येष्ठ उद्योजक अरुण गांधी, निखिल गांधी व कुटुंबीय, सचिन उर्फ गुंडा मराठे, ओंकार संसारे, अनिल कोंडविलकर, विनोद जानवळकर, राजन जानवळकर, संदेश जानवळकर, समीर जानवळकर, विशाल जानवळकर, सुधीर जानवळकर व कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व साई भक्तांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!