मुख्य बातमी

आयटीआय संगमेश्वर येथे लेखनिक सहाय्यक पदावर तात्पुरत्या मानधनावर पदभरती

रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समितीच्या कामकाजासाठी तात्पुरत्या मानधन तत्वावर लेखनिक सहाय्यक नेमण्याचे आहे. गरजू उमेदवारांनी संस्थेत १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले अर्ज करावेत, असे आवाहन सदस्य सचिव आयएमसी ऑफ आयटीआय संगमेश्वर र. वि. कोकरे यांनी केले आहे.

पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३८ वर्ष, शैक्षणिक अर्हता पदवीधर (वाणिज्य शाखेतील पदवीस प्राधान्य), संगणक ज्ञान, टंकलेखन मराठी-इंग्रजी, ऑनलाइन कामकाज हाताळण्याचे ज्ञान, कामाचा अनुभव किमान १ वर्षाचा, लिपिक पदाचा अनुभव आवश्यक आहे. आयएमसी ऑफ आयटीआय संगमेश्वर संस्थेने निश्चित केलेले मानधन अदा करण्यात येईल. प्रथग नियुक्तीचा कालावधी ११ महिने इतका असेल व त्याबाबत बंधपत्र घेण्यात येईल. सर्व प्रवर्गांना समान संधी उपलब्ध आहे. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत अजिबात तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असल्याबाबतचा दाखला देण्यात येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!