ग्रामपंचायत आपटी बोरघरमार्फत “एक पेड माँ के नाम” २.० अभियान यशस्वी

दापोली : तालुक्यातील ग्रामपंचायत आपटी बोरघरमार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज (५ जून) “एक पेड माँ के नाम 2.0” अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना १५० लाल चंदनाच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले.


या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच संपदा संदीप आग्रे, उपसरपंच अस्मिता भेकरे, सदस्य संतोष घडवले, सोनाली कदम ग्रामपंचायत अधिकारी मानसी विलास साळुंके, माजी तंटामुक्त अध्यक्ष, आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


त्या वेळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वृक्षांची लागवड करण्यात आली. सरपंच संपदा आग्रे यांनी चंदनाच्या झाडांचे महत्त्व विषद करून वृक्ष संवर्धनाची माहिती दिली. या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपटी बोरघर ग्रामपंचायतमध्ये असे विविध कार्यक्रम होत असल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

