मुख्य बातमी

सीएनजी वाहतूक करणाऱ्या टँकरची खासगी ट्रॅव्हल्सला धडक

बावनदीन येथे अपघात : ३१ प्रवासी जखमी 

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सला निवळीकडून येणाऱ्या सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्स सुमारे २० फूट खोल दरीत कोसळली असून, यात ३१ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात रविवारी (८ जून) सकाळी बावनदी येथे झाला आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या धडकेमुळे ट्रॅव्हल्सवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट दरीत कोसळली. अपघातानंतर टँकरमधून वायू गळती सुरू झाल्याने घटनास्थळी आणि परिसरातील प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून, जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

जखमींची नावे अशी : संकेत कृष्णकांत जागुष्टे (वय २८), विराज राजाराम सावंत (४१, सावर्डे), मंदा सुखदेव खाडे (५३, सावर्डे), स्मिता मधुकर पाटील (४८, दहिवली), उषा अमोल खुडे (३८, खेर्डी), जयश्री सूर्यकांत गावडे (५४, सावर्डे), प्रियांका दिलीप जाधव (३८, सावर्डे), नेहा संतोष मेस्त्री (४७, सावर्डे), धर्मेंद्र दत्तात्रय देरुगडे (५३, चिपळूण), दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे (५३, सावर्ड), सुलक्षणा संभाजी पाटील (४०, चिपळूण), निशिकांत दीनानाथ वानरकर (५१, सावर्डे), वृषाली सुकांत यादव (५०, खेर्डी), हर्षाली हेमंत पाकळे (३६, निवळी), नीता विनायक बांद्रे (३८, गोवळकोट), मीना सुभाष घाडगे (५२, चिपळूण), सोनाली हरेश सावंत (३०, सैतवडे), कमल किशोर किशन महाडिक (३७, चिपळूण), प्रेमकुमार बबन शिवगण (४४, चिपळूण), अमोल गणेश कोतवाल (३५, सती), मनीषा संतोष कांबळे (४७, खेर्डी), मालिनी दीपक चव्हाण (४०, धारतळे), श्वेता संजय चव्हाण (४८, चिपळूण), प्रियंका जाधव (३८, सावर्डे), राजेश यादव (४७, सावर्डे), गणेश महादेव सावर्डेकर (४५, सावर्डे), सुरेंद्र दीपक सावंत (४०, चिपळूण), सचिन अशोक पोकडे (४३, सावर्डे), उदय पांडुरंग खताते (५०, चिपळूण), अरविंद अनंत सकपाळ (४६, चिपळूण), मीना विनायक सिरकर (३७, चिपळूण)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!