मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

विसापूर (दापोली) येथे दापोली पोलिसांमार्फत गोवंशाची सुटका; एकजण ताब्यात

दापोली : तालुक्यातील विसापूर येथील समशेट अली नगर मोहल्ला येथे एका घरामध्ये गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी कोंडून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांना अवगत करून ७ जून रोजी दापोली पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यात गोठ्यामध्ये बैल, गायी व छोटी वासरे जखडून बांधून व कोंडून ठेवकेल्या अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या आहेत.

त्याअनुषंगाने ७ जून रोजी दापोली पोलिस ठाणे हद्दीमधील विसापूर येथील समशेट अली नगर मोहल्ला येथे एका घरामध्ये गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी कोंडून ठेवल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर या माहितीची शहानिशा करून पोलिस अधीक्षक श्री. बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांना अवगत करून दापोली पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला असता गोठ्यामध्ये जखडून बांधून व कोंडून ठेवलेले बैल, गायी व छोटी वासरे मिळून आली.

याचप्रमाणे मोहल्यामध्ये हानीफ शेख अली मालवणकर याच्या घरालगत असणाऱ्या जंगलयुक्त भागात देखील अधिक पाहणी करीत असताना ३ गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी जखडून बांधून ठेवली असल्याचे दिसून आले. गोठ्यातील व जंगलयुक्त भागातील एकूण १ बैल, १५ गाई व ४वासरे अशा सर्व गोवंश जनावरांची तात्काळ सुटका करून व त्यांना ताब्यात घेऊन गोशाळेमध्ये जमा करण्यात आली आहेत.

या घटनेच्या अनुषंगाने आरोपी हानीफ शेख अली मालवणकर यास ताब्यात घेतले असून त्याच्यासह त्याचा मुलगा तसेच भाऊ या तीनही आरोपींविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

ही, कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक, श्री. बगाटे, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक राजकुमार यादव, पो.उ.नि. महेश पाटील, पो.उ.नि. हेमराज निर्मळ, पो.उ.नि. श्री मिलिंद चव्हाण, पो.हवा. अभिजीत पवार, पो.हवा. श्रीमती रूपा ढोले, पो.हवा. श्रीमती साक्षी गुजर, पो.कॉ. विकास पवार, पो.कों. विजयंन सातारडेकर, पो.कॉ. सुरज मोरे, पो.कॉ. विशाल कदम, पो.कों. निलेश जाधव व पो.कॉ अतुल साप्ते यांनी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!