मुख्य बातमी
ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट

रत्नागिरी : जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष थरवळ आणि कार्यवाह राजेंद्र कदम यांनी नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेऊन त्यांचे समन्वय समितीतर्फे स्वागत केले.
या भेटीदरम्यान प्रत्येक पोलिस स्थानकात ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापन करणे तसेच जिल्हास्तरावर पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षते खालील ज्येष्ठ नागरिक समितीची बंद झालेली सभा पुन्हा सुरू करणे याबाबत निवेदन देण्यात आले.


