आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील व महिला शेतकऱ्यांसाठी ३० जूनपर्यंत पंधरवडा; ॲग्रीस्टॅक बंधनकारक

रत्नागिरी : कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महिला शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी १५ ते ३० जून या कालावधीमध्ये मोहीम स्वरूपात पंधरवडा राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) असणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजिकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा https://mahadbtmahait.gov.in या आज्ञावलीवर करावेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फलोत्पादनाशी निगडीत तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता रक्कम रुपये १३ लाख ४८ हजार व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता रक्कम रुपये ४ लाख ८९ हजार रुपयांचा कार्यक्रम जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे. यामधे उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटीका, क्षेत्रविस्तार घटकांतर्गत ड्रगन फ्रुट (Exotic Fruit Crop), पुष्पोत्पादन, फळपिके, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, काढणीत्तोर व्यवस्थापन आणि पणन सुविधा इ. विविध बाबींचा समावेश आहे.

सर्व योजनांच्या अधिक माहितीसाठी गावपातळीवरील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याही संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

कृषी विभाग विविध योजना :

* ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक काढणे.

* महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड

* स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

* राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व कृषी यांत्रिकीकरण उपअभियान

* राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सुक्ष्म सिंचन योजना

* राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण

* प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

* पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

* प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत इ-केवायसी, आधार जोडणे व जमीन जोडणे (Land Seeding)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!