मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
खेडमधील पुराचे पाणी ओसरले

खेड : मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे काल जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे पुराचे पाणी खेड बाजारपेठेत भरले होते; मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी आल्याने नदी पातळीतही घट झाली. त्यामुळे शहरात काल (१९ जून) भरलेले पुराचे पाणी पूर्णतः ओसरले आहे.

खेड नगर पालिकेमार्फत स्वच्छतेचे काम आज सकाळपासून सुरू करण्यात आले आहे. परिस्थिती जवळपास पूर्वपदावर असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे.



