मुख्य बातमी

रत्नागिरी शहर पोलिस ठाणे यांच्या वतीने रा. भा. शिर्के प्रशालेत मार्गदर्शन 

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यामार्फत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्याच्या दृष्टीने पोलिस विभागाच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली.

त्यानंतर रंजन मंदिरमध्ये पुढील कार्यक्रम झाला. शाळेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शहर पोलिस निरीक्षक श्री. शिवरकर यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे शरीरावर तसेच आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच त्याविषयी असणाऱ्या कायद्यांविषयी मार्गदर्शन करतानाच विद्यार्थ्यांनी स्वतःला नेहमीच अमली पदार्थांपासून दूर ठेवावे, असा सल्ला दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देऊन जबाबदार नागरिकाची भूमिका योग्य पद्धतीने बजावण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी श्री. शिवरकर यांच्या समवेत शहर पोलिस ठाण्यातील पोलीसही उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. डोईफोडे यांनी केले. सौ. दुदगीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!