मुख्य बातमी

रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : पोलिस अधीक्षक कार्यालयात ३० जून रोजी जिल्हा पोलिस दलातील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित केला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी सेवा निवृत्त होणाऱ्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांची प्रशंसा केली व शाल व श्रीफळ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे उर्वरित आयुष्य हे आनंदी व निरोगी जावे यासाठी देखील शुभेच्छा देऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.

या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक (पो. मुख्या.) श्रीमती राधिका फडके, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नागिरी उपविभाग नीलेश माईनकर, परि. पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, सहायक पोलिस निरीक्षक युवराज सूर्यवंशी, कल्याण शाखा तसेच सेवा निवृत्त होणारे सर्व पोलिस अधिकारी यांचे कुटुंबीय, पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.

३० जून रोजी रत्नागिरी पोलिस दलातील नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झालेले पोलिस अधिकारी असे : उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत रघुनाथ केडगे (लांजा उपविभाग), श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुधीर लक्ष्मण कदम (खेड पोलिस ठाणे), श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दीपक शांताराम पवार (पोलिस मुख्यालय, रत्नागिरी), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय नारायण कदम (मोटार परिवहन विभाग, रत्नागिरी), श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मिलिंद राजाराम चव्हाण (दापोली पोलीस ठाणे).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!